करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ससून रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना इतर रुग्णालयात रक्त तपासणीसाठी पाठवत असल्याचा आरोप मानव आधार सामाजिक संघाचे अध्यक्ष दशरथ शेट्टी यांनी केला.
ससून कोविड सेंटरमधील कर्मचारी व डाँक्टर कोरोना बाधित रुग्णाचे अहवाल व्यवस्थित न देता इतर रुग्णालयातून रक्त तपासणी करण्यास सांगतात कोरोना हा गंभीर आजार असल्याने त्याचा ञास इतरांनाही होऊ शकतो.ससून मधील कोविड सेंटरमध्ये येणारे नागरिक हे कोरोना पाँझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असणाऱ्या रुग्णाचे नातेवाईक यांना रक्ताचे नमुने देऊन इतर रुग्णालयात तपासणी करण्यासाठी पाठवत आहे.या प्रक्रियेमुळे रुग्णाच्या नातेवाईकांना कोरोना विषाणूची लागण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ससून रुग्णालय प्रशासनाची राहिल असे मानव आधार सामाजिक संघाचे अध्यक्ष यांनी ससून रुग्णालयाचे अधिक्षक यांना लेखी निवेदनाद्वारे सांगितले.त्याच बरोबर कोविड सेंटर मधील डाँक्टर व कर्मचारी यांनी नागरिकांच्या जिवाशी न खेळता रुग्णाच्या रक्त तपासणी करण्यासाठी आवश्यक फि घ्यावी किंवा मोफत करावी,ससूनमधील कोरोना बाधित रुग्णांना चांगली सेवा उपलब्ध करून द्यावी,कोविड सेंटरची वारंवार साफ सफाई करावी तसेच रुग्णाचे नातेवाईक यांना कोणत्याही प्रकारचा ञास होणार नाही यांची दक्षता घ्यावी अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष दशरथ शेट्टी यांनी केली.अन्यथा मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देते वेळी सांगितले.
यावेळी ताडिवाला रोड विभाग अध्यक्ष किरण खरात,उपाध्यक्ष कांच्या घोडाके,युवक अध्यक्ष विनायक नायडू,सागर डाळिंबे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.