पुणे-अप्पर डेपो शेजारील सुखसागर नगर रोड या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचनालयवर अतिक्रमणाची कारवाई करत असताना छञपती शिवाजी महाराज,डाँ.बाबासाहेब आंबेडकर,लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेची विठबंना करण्यात आली.ही कारवाई अतिक्रमण अधिकारी गणेश तारु यांनी केली.चुकीच्या पद्धतीने व कोणतीही पुर्वकल्पना,नोटिस न देता कारवाई केल्याचा आरोप लहुजी शक्ती सेनेने केला आहे.साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १००वी जन्मशताब्दी जयंती साजरी करत असताना प्रतिमेची विठंबना करणाऱ्या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करून सेवेतून निलंबित करावे असे संघटनेने निवेदनद्वारे मागणी केली.या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश द्यावेत त्याच बरोबर अतिक्रमणाची कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करावी अन्यथा सकल मातंग समाज राज्यभर जन आंदोलन करेल असे निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर नामदेव घोरपडे,शहाजी रणदिवे व बाळा रणदिवे यांची स्वाक्षरी होती.
कोंढवा येवलेवाडी क्षेञिय कार्यालयाकडून अतिक्रमण कारवाई करताना महापुरषांच्या प्रतिमेची विठबंना