पुण्यात भर दिवसा गोळीबार, पुणे आयुक्त कार्यालयजवळील घटना

पुणे आयुक्त कार्यालय जवळ दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी एकावर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना दुपारी 3 सुमारास घडली.यात गोळी लागल्याने एकजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.



सविस्तर माहिती अशी की,चर्च रोड वरील एस.बी आय बँकेच्या ट्रेझरी जवळ हा गोळीबार झाला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून,नेमके गोळीबारचे कारण समजू शकले नाही.जखमीस पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.भरदिवसा गोळीबार झाल्याने त्या परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.घटनास्थळी गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पश्चिम विभागाचे अप्पर आयुक्त डॉक्टर संजय शिंदे, उपायुक्त स्वप्ना गोरे, यांच्यासह अधिकारी व बंडगार्डन पोलीस दाखल झाले आहेत. दरम्यान गोळीबारात जखमी झालेल्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती घटनास्थळावरील उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.


Popular posts
पुणे महानगर परिवहन महामंडाळातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करा -संचालक पवार
Image
ठेकेदारांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे नागरिकांच्या बाथरूममधून पाणी
Image
दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ.प्रतापसिंह जाधव यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस ऊसतोड कामगार यांचे हस्ते केक कापून साजरा
Image
लहुजी शक्ती सेनेच्या पुणे जिल्हा कोअर किमिटी अध्यक्ष पदी नामदेव घोरपडे यांची निवड
Image
ताडीवाला रोड येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
Image