राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्ञी यांच्या जयंती निमित्ताने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य आणि ताडीवाला राेड ख्रिस्ती मंडळी चर्च यांच्या संयुक्त विद्यमाने ताडीवाला राेड प्रायव्हेट राेड येथील १० वी १२ वी उत्तीर्ण झालेल्या गुणवत्त विद्यार्थ्यांना माेफत वह्या-पुस्तक, माक्स,सॅनीटायझर व जिवानाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ शेट्टी व महिला प्रदेशाध्यक्षा सौ.धनश्री शेट्टी यांच्या हस्ते उत्तीर्ण विद्यार्थीचा सत्कार केला.उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थीना व पालकांना शिक्षणा बाबत मार्गदर्शन केले.यावेळी मानव आधार सामाजिक संघ कडून उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.या कार्यक्रमास मा.जनार्दन जगतात सरचिटणीस पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस,साै.सुमन गायकवाड बीएसपी कार्यकर्त्या साै.डाॅ.वृषाली रणधीर प्राेफेसर आँफ काँमरस वाडीया काॅलेज,मा.देवाप्पा साेनार अध्यक्ष ताडीवाला राेड नागलिंगेश्वर कमरी मठ,मा.सागर कांबळे अध्यक्ष लुंबिनी बुध्द विहार ता.राेड,मा.अन्थाेनी वाकडे ता. राेड वार्ड अध्यक्ष काँग्रेस,मा.उत्तम बनसाेडे सामाजिक कार्यकर्ते मा.बाबा कांबळे अध्यक्ष पुणे स्टेशन रिक्षा स्टॅन्ड,मानव आधार पदाधिकारी कु.पुनम धाेत्रे युवती अध्यक्षा पुणे शहर मा.रमेश भंडारी कार्याध्यक्ष पुणे शहर,मा.कांचन घाेडके चिटणीस पुणे शहर,विनायक नायडू युवक अध्यक्ष ता.राेड,नागेश फुले युवक उपाध्यक्ष ता.राेड, राहुल म्हेत्रे अध्यक्ष खराडी,सतिश गायकवाड संघटक ता.राेड,किरण खरात अध्यक्ष ता.राेड आदि कार्यकर्ते उपस्थित हाेते