महाराष्ट्रभर तसेच इतर राज्यातही पोहचलेली संघटना लहुजी शक्ती सेना या सामाजिक संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी नामदेव घोरपडे यांची नियुक्ती करण्यात आली.
सविस्तर माहिती अशी की,लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सोमनाथभाऊ कांबळे,महाराष्ट्र राज्य कोअर कमिटीचे अध्यक्ष कैलासभाऊ खंदारे तसेच महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष ॲड.हेमंतभाऊ खंदारे यांच्या प्रमुख उपस्थित पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या वेळी सर्वांमते नामदेव घोरपडे यांची पुणे जिल्हा अध्यक्षपदी (कोअर कमिटी) निवड करण्यात आली.या प्रसंगी पुणे शहर,जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.