मानव आधार सामाजिक संघाकडून पञकारांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप

सर्व जग कोरोना विषाणू विरोधात लढत आहे.प्रत्येकालाच स्वतःची व कुटुंबाची काळजी वाटत आहे.आरोग्य, पोलिस, महानगरपालिका, डॉक्टर, नर्स,वार्डबाँय,विविध खात्यातील अधिकारी,कर्मचारी अहोराञ निस्वार्थपणे काम करत आहे.त्याचबरोबर लोकशाहीतील चौथा स्तंभ प्रसारमाध्यमधील पञकार आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेपर्यंत अचूक व योग्य माहिती पोहचविण्याचे काम करत आहे.



प्रिंट मिडियाचे व इलेक्ट्रॉनिक मिडायाचे देशाच्या जडणघडणी मध्ये सिंहाचा वाटा आहे.त्यामुळे शासन व जनतेचा दुवा म्हणून काम करणार लोकशाहीतील चौथा स्तंभ काम करतो.आज देशात कोरोना विषाणूचा कहर सुरू आहे.टाळेबंदीमुळे जनतेला घरात राहणे बंधनकारक झाले होते.शासनाने काही प्रमाणात शिथिलता दिल्याने नागरिक घराबाहेर पडत आहे.परंतु संपूर्ण टाळेबंदीमध्ये आपली व आपल्या परिवाराची कुठलीही पर्वा न करता पञकारांना घराबाहेर फिरावे लागले होते.


सामाजिक,राजकीय,शासकीय,क्रिडा,आरोग्य,यासह सर्व क्षेत्रातील वृत्तांकन करत आपले कर्तव्य पार पाडत आहे.काही पञकांराची परिस्थिती फारच बिकट आहे.याची दखल घेत मानव आधार सामाजिक संघाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ शेट्टी व उपाध्यक्ष बाळूमामा हिरमेठकर यांनी पुणे शहरातील पञकारांना जिवनावश्यक वस्तूंबरोबर मास्क,सॅनिटायझरचे वाटप केली.यावेळी दशरथ शेट्टी व बाळूमामा हिरमेठकर यांनी कोरोना महामारी काळात केलेल्या कार्याबद्दल पञकांराचे अभिनंदन केले.



या कार्यक्रमास सर्वाधिक पत्रकार संघाचे अध्यक्षा कांचन बडवाणे साप्ताहिक पुणे प्रवाहचे संपादक संताेष सागवेकर, पुणेकर माझाचे संपादक संताेष शिदे,साप्ताहिक महाराष्ट्र प्रवाहचे संपादक परशुराम गंगानाेर,मानव आधार संघचे पुणे शहर कार्याध्यक्ष रमेश भंडारी,संघटक चंदु म्हेत्रे, पुणे शहर युवती अध्यक्षा पुनम धाेत्रे,ताडीवाला राेड युवक अध्यक्ष विनायक नायडू, ता.राेड अध्यक्ष किरण खरात,ता.राेड संघटक सतिश गायकवाड,संताेष सदगुरू,सागर आदी उपस्थित होते.पत्रकार बंधू भगिनींनी मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य चे आभार व्यक्त केले.


Popular posts
पुणे महानगर परिवहन महामंडाळातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करा -संचालक पवार
Image
ठेकेदारांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे नागरिकांच्या बाथरूममधून पाणी
Image
दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ.प्रतापसिंह जाधव यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस ऊसतोड कामगार यांचे हस्ते केक कापून साजरा
Image
लहुजी शक्ती सेनेच्या पुणे जिल्हा कोअर किमिटी अध्यक्ष पदी नामदेव घोरपडे यांची निवड
Image
ताडीवाला रोड येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
Image