कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून महावितरणकडून प्रत्यक्ष रिडिंग न घेता ग्राहकांना वाढिव बिले देण्यात आली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लाॅकडाउनमुळे मोठ्या प्रमाणात व्यवसाय व कामे बंद पडली आहेत.नागरिक घरात असल्याने सर्वांची रोजीरोटी बंद आहे.त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाउन काळातील वीज बिल माफ करावे किंवा त्यामध्ये ग्राहकांना सवलत देण्यात यावी यासाठी मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य च्या वतीने वाडीया काँलेज विद्युत महावितरण कार्यालयाबाहेर ताडीवाला राेड प्रायव्हेट राेड मधील गाेर गरिब नागरिकांचे वीजबील जास्त आल्याने महिलाच्या उपस्थित आंदोलन करण्यात आले.लॉकडाउनमुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.अशातच महावितरणकडून ग्राहकांना अव्वाच्यासव्वा बिले दिले आहेत.त्यामुळे ज्यांचे हातावर पोट आहे,अशांना ही बिले भरणे कठीण झाली आहेत.
- यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा धनश्री शेट्टी, संस्थापक अध्यक्ष दशरथ शेट्टी,पुणे शहर चिटणीस कांच्याभाऊ घाेडके,संताेष सदगुरू,महिला मंडळ,आणि स्थानिक नागरिक उपस्थित हाेते.