अप्पर-बिबवेवाडी येथील कचरा प्रकल्पामुळे नागरिक हैराण झाले आहेत.सविस्तर माहिती अशी की,पुणे महानगरपालिकेचा अप्पर डेपो स्थित कचरा प्रकल्प आहे.त्या परिसरातील कचरा नेऊन वर्गीकरण करण्यात येतो.
परंतु पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी एकञित केलेला कचरा प्रत्यक्षात प्रकल्पात न नेता प्रवेशद्वारा जवळ टाकून ओला कचरा व सुका कचरा त्याच ठिकाणी वेगळा करत असल्याचे निदर्शनास येते.त्यामुळे बस स्थानकामध्ये येणाऱ्या प्रवाशांना त्या दुर्गंधीचा ञास सहन करावा लागत आहे.या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक राहत असून त्यांनाही ञास सहन करावा लागत आहे.दुर्गंधीमुळे रोगराई पसरण्याची भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहे.
प्रशासनाने याकडे लक्ष देऊन गोळा केलेला कचरा बस स्थानकाच्या प्रवेशद्वारा जवळ टाकणाऱ्या कर्मचाऱ्यांवर व संबंधित अधिकाऱ्यांनावर कारवाई करावी असे स्थानिक नागरिक मागणी करत आहे.