साप्ताहिक महाराष्ट्र प्रवाहने "अप्पर बिबवेवाडी कचरा प्रकल्पामुळे नागरिक हैराण " या मथळ्याखाली वृत प्रकाशित केले होते. पुणे महानगरपालिका प्रशासनाने बातमीची त्वरित दखल घेत अप्पर-बिबवेवाडी येथील कचरा प्रकल्पाबाहेर टाकणार कचरा हटविला.
महानगरपालिकेचा अप्पर डेपो स्थित कचरा प्रकल्प आहे.त्या परिसरातील कचरा नेऊन वर्गीकरण करण्यात येतो.तेथील कर्मचारी एकञित केलेला कचरा प्रत्यक्षात प्रकल्पात न नेता प्रवेशद्वारा जवळ टाकून ओला कचरा व सुका कचरा त्याच ठिकाणी वेगळा करत होते म्हणून साप्ताहिक महाराष्ट्र प्रवाहने वृत प्रकाशित केले होते.स्थानिक नागरिकांची अडचण समजून प्रशासनाने तातडीने हालचाली करून तेथील परिसर स्वच्छ केला.या बद्दल नागरिकांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले.