कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहीहंडी उत्सव रद्द झाल्यामुळे वेळेचा सदपयोग व्हावा म्हणून पुण्यातील साईदत्त ग्रुपने मुळशी तालुक्यातील कळमशेत गावामध्ये वृक्षरोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
कार्यक्रमाची सांगता करून साईदत्त ग्रुपचे सर्व पदाधिकारी ताम्हिणी घाटमार्गे पुण्याच्या दिशेने जात असताना घाट परिसर क्षेत्रात पडत असलेला पाऊस,दाटधुके अश्या भयानक परिस्थितीमध्ये साईदत्त ग्रुपच्या पदाधिऱ्यांना एक महिला रत्काळलेल्या अवस्थेत येणाऱ्या,जाणाऱ्या नागरिकांना थांबविण्याचा प्रयत्न करत असताना दिसली. पण कोणीही थांबत नव्हते.अश्या परिस्थितीमध्ये साईदत्त ग्रुपचे रवी डोंगरे,सुरज पेटाडे,पवन डोंगरे,रवी नांगरे,योगेश बोरकर,केदार कुलकर्णी यांनी आपल्या साथीदारांसह त्या महिले जवळ जाऊन विचारपूस करु लागले.सदर महिलेनी मि व माझा पती गाडीने ताम्हिणी घाटमार्गे जात असताना आमची गाडी दरीमध्ये कोसळली आहे मि गाडीतून उडी मारली.भ्रमणध्वनी माध्यमातून कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नसल्यामुळे रूग्णवाहिकेची वाट न बघता साईदत्त ग्रुपच्या पदाधिऱ्यांनी त्या महिलेस पुढील उपचारसाठी पाठविले.सुरज पेटाडे व त्यांच्या इतर साथीदारांनी ७०-८० फुट खोल दरीमध्ये दोरीच्या सहाय्याने झाडामध्ये अडकलेली गाडी काढत असताना सदर महिलेचा पती बेशुद्ध परिस्थितीत दिसल्याने त्यास पौडगावा मधील शासकीय रूग्णालयात दाखल करून त्यांच्या नातेवाईकांना माहिती दिली.
सुरज पेटाडे व त्यांचे इतर साथीदारांनी दाखविलेल्या माणूसकी बद्दल नव दाम्पत्यांच्या नातेवाईकांनी आभार मानले.