स्वतःचे दुःख विसरून इतरांना मदत करणारा कोरोना योद्धा गणेश ठाकर

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने आपल्या देशावरही जाळ घट्ट करायला सुरवात केली आहे.हा संसर्गजन्य आजार रोखण्यसाठी प्रशासनाने टाळेबंदीचा निर्णय घेतला होता.त्यामुळे काही प्रमाणात कोरोना विषाणूपासून दिलासा मिळण्यास मदत झाली.परंतु टाळेबंदीमुळे नागरिकांना मानसिक व आर्थिक अडचणीचां सामाना करावा लागत आहे.टाळेबंदी दरम्यान विविध पक्षातील,संघटनेमधील आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी त्याच बरोबर काहींनी व्यक्तीगत आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना व गरीब,गरजूनां जमेल त्या पध्दतीने सहकार्य करण्याचे काम केले.याच दरम्यान राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे पोलिसांना अहोराञ प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून बंदोबस्त करायला लागत असे त्याच बरोबर पोलिसांना दैनंदिन कामकाज,गुन्ह्यांचा तपास,आरोपपञ तयार करण्याबरोबर कायदा सुव्यवस्था राखण्याचे व जमावबंदीचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे काम करावे लागत असे.पोलिसांना अहोराञ काम करावे लागत असल्यामुळे पोलिसांवरचा हा ताण कमी करण्यासाठी प्रशासनाने "महाराष्ट्र पोलिस अधिनियम " मधील तरतूदीनुसार संपूर्ण शहरात सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींची विशेष पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.दत्तवाडी पोलिस स्टेशन कार्यक्षेञामध्ये दत्तवाडीतील सामाजिक कार्यकर्ते गणेश केरबा ठाकर यांची विशेष पोलिस अधिकारी म्हणून निवड झाली.गणेश ठाकर हे विशेष पोलिस अधिकारी पदाचा योग्य वापर करत आहे.


गेली चार महिने विशेष पोलिस अधिकारी म्हणून गणेश ठाकर यांनी अनेक सामाजिक उपक्रम अंतर्गत आरोग्य शिबीर,रक्तदान शिबीराचे आयोजन केले. गरजूंना मोफत औषधे वाटप केली. रेशनिंग दुकानात व सोसायटी परिसरात येणाऱ्या नागरिकांना सामाजिक,शारीरिक अंतर,मास्क, सॕनिटायझरचा वापरराबाबत प्रबोधन केले.ठिकठिकाणी पुणे महानगर पालिकेच्या सहकार्याने औषधं फवारणी करून घेतली.


कोरोनाबाधित रुग्णांना व नागरिकांनाही प्रबोधनाच्या माध्यमातून धीर देण्याचा प्रयत्न केला.कोरोनाबाधित रुग्णांना खाट उपलब्ध करून देण्यासाठीही खूप प्रयत्न केले.गणेश ठाकर यांनी स्वतः दत्तवाडीतील 2500 नागरिकांच्या शरीर तापमानाची टेस्ट केली.नागरिकांची स्वॕब टेस्ट करून त्यांना चहा - नाष्टा देणे अहवाल प्राप्तीनंतर त्यांना विलगीकरण होण्यासाठी मदत करून त्यांचे मनोबल वाढवत अनेक विधायक कामे केली.गरीब गरजुंना पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून धान्य किट मिळवून देण्याचे काम केले.


संचारबंदीच्या काळात पोलिसांना ठिकठिकाणी नाकाबंदी आणि पेट्रोलिंग साठी सहकार्य केले.परप्रांतीय बांधवाना त्यांच्या राज्यात जाण्यासाठीही मदत केली.


दुःखाचा डोंगर-


विशेष पोलिस अधिकारी म्हणून काम करत असताना दुर्दैवाने गणेश केरबा ठाकर कोरोना बाधित झाले त्याच बरोबर गणेश ठाकर यांचे बंधू ,पुतण्या,मुलगी शेजारी राहणारे मामा,मामी,मामाची दोन मुलेही कोरोना बाधित झाले.टप्याटप्याने सर्वजण कोरोनावर यशस्वी मात करून सुखरूप घरी परतले परंतु याच दरम्यान गणेश ठाकर यांच्या मातोश्रीचे निधन झाले.त्यांचे अचानकपणे जाणे हे गणेश ठाकर यांच्यासाठी खूपच धक्कादायक होते.समाजात काही माणसं अशी असतात की,ज्यांच्या कर्तृत्वाचा सुगंध चौफेर दरवळत असतो.आपले जगणे कठीण असूनही इतरांसाठी सतत धडपडत असतात.आपल्या पदरांतील चांदणे इतरांच्या ओंजळीत टाकण्यात त्यांना धन्यता वाटते.सतत हसणारी इतरांना हसवणारी माणसं,खरं आपले दुःख लपवत असतात.गणेश ठाकर यांचे बरेच मित्र, नातेवाईकांनी सामाजिक काम थांबव म्हणून सांगत होती पण गणेश ठाकर यांनी अनेक संकटांचा सामना करत काही काळसाठी थांबवलेले विशेष पोलिस अधिकारी पदाचे काम पुन्हा नव्या जोमाने चालू केले.


प्लाझमा बाबत अनेक उलटसुलट बातम्या येत होत्या तसेच आर्थिक गैरव्यवहार होत आहे.अश्या बातम्या वाचून गणेश ठाकर यांनी एका गरजवंत वयस्कर मावशींना प्लाझमा दान केले.याच कालावधीत गणेश ठाकर यांनी पुन्हा आरोग्य शिबिराचे आयोजन केले.यामध्ये 325 नागरिकांना मोफत औषधं देण्यात आली. 


या सर्व कामासाठी विशेष पोलिस अधिकारी गणेश केरबा ठाकर यांना दत्तवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळाले.


Popular posts
पुणे महानगर परिवहन महामंडाळातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करा -संचालक पवार
Image
ठेकेदारांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे नागरिकांच्या बाथरूममधून पाणी
Image
दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ.प्रतापसिंह जाधव यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस ऊसतोड कामगार यांचे हस्ते केक कापून साजरा
Image
लहुजी शक्ती सेनेच्या पुणे जिल्हा कोअर किमिटी अध्यक्ष पदी नामदेव घोरपडे यांची निवड
Image
ताडीवाला रोड येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
Image