आजच्या तरुण पिढीला ९ ऑगस्ट क्रांती दिनाचे महत्त्व व स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास पुर्णपणे माहिती असावी म्हणून इनक्रेडिबल समाजसेवक गृपने ९ ऑगस्ट क्रांती दिन रॕली काढली.
१९४२ साली महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सरकारला भारत छोडो,अंग्रेजो भारत देश से चले जावचा नारा देत देशात स्वातंत्र्याची ज्योत पेठवली होती.पंडित जवाहरलाल नेहरू यांनी करो या मरो चा नारा देत भारतीय जनतेस स्वातंत्र्य मिळविण्याची प्रेरणा दिली.सलग पाच वर्षाच्या क्रांती नंतर १९४७ साली देशास स्वतंत्र मिळाले.रॕली सुरुवात शितल पेट्रोल पंप येथील मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेस प्रभाग क्र २७ चे नगरसेवक हाजी गफूर पठाण,मजहर शेख,हबिब शेख यांनी पुष्पहार अर्पण करून आशिर्वाद बिल्डिंग मेन रोड भैरोबा मंदिर कोंढवा गावठाण मार्गे ज्योती होटेल चौका पर्यंत आयोजित केली होती. या प्रसंगी युक्रात संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष सुदर्शन चकाले, मोहम्मद खान,गणेश भुईटे,इजाज शेख व इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान यांनी क्रांती दिनाची माहिती दिली.रॕलीचे नेतृत्व महिला विभागचे किरण शेख,शाहिन शेड्डकी,आयशा फरास यांनी केले.यावेळी सचिन अल्हाट,राजू सय्यद,कबिर खान,नासिर शेख यांनी क्रांती दिनाचे माहिती फलक लावले.
सदर रॕलीचे आयोजन जानभाई,जोसेफ पाँल (आँल इडिया काँग्रेस मायनॉरिटी वरकर्स गृपचे राष्ट्रीय अध्यक्ष) व त्याचे पदाधिकारी,सुहेल जाफरी,शोएब शेख साहिल मणियार, शानु पठाण,जालिदर वाघमारे इतर पदाधिकारी यांनी केले.रॕलीत नर्मदा बचाव आंदोलन युक्रात संघटना,आझाद हिंद सेना,राष्ट्रीय मानवाधिकार संघटना, क्राईम सेटर व विविध संघटनेचे पदाधिकारी,इब्राहिम खान,बशिर सय्यद भालेकर भाऊ सुदरक्षन चिकले ध्वज अध्यक्ष भालेकर साहेब ध्वज रक्षक असलम इसाक बागवान यांनी ध्वजवंदन केले.तर राष्ट्रगीतद्वारे हुतात्मास श्रद्धांजलीअर्पण करून रॕलीची सांगता करण्यात आली.