कात्रज येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त व अतिक्रमण अधिकारी गणेश तारु तसेच संबंधित अधिकाऱ्यांनवर गुन्हा दाखल करावा-लहुजी शक्ती सेना

पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरातील काही दिवसापुर्वी काञज-येवलेवाडी क्षेञिय कार्यालयामधील अतिक्रमण अधिकारी गणेश तारु यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचनालयाची तोडफोड केली होती.परंतु ही अतिक्रमण कारवाई करण्यापुर्वी संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही पुर्व सूचना न देता केली आहे.कारवाई करत असताना छञपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,क्रांतीपिता लहुजी वस्ताद साळवे या महापुरषांचे छायाचित्रे असलेले बँनर व बोर्डाची तोडफोड करून विठबंना केलेली आहे.असा आरोप लहुजी शक्ती सेनेने केला आहे.अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई व्हावी म्हणून लहुजी शक्ती सेनेने १० ऑगस्टलाला आंदोलन केले होते.



एकीकडे साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०० व्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे म्हणून सर्व पक्षीय खासदार,आमदार,नगरसेवक इत्यादी सर्व जण प्रयत्न करत आहे.


लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०० व्या जन्मशताब्दीच्या पार्श्वभूमीवर झालेली कारवाई अत्यंत निदंनीय असून अतिक्रमण अधिकारी गणेश तारु व इतर संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनावर अनुसूचित जाती जमाती सुरक्षा कायदा अंतर्गत कारवाई करावी म्हणून लहुजी शक्ती सेनेने पोलिस आयुक्त यांना निवेदन दिले आहे.


Popular posts
पुणे महानगर परिवहन महामंडाळातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करा -संचालक पवार
Image
ठेकेदारांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे नागरिकांच्या बाथरूममधून पाणी
Image
दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ.प्रतापसिंह जाधव यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस ऊसतोड कामगार यांचे हस्ते केक कापून साजरा
Image
लहुजी शक्ती सेनेच्या पुणे जिल्हा कोअर किमिटी अध्यक्ष पदी नामदेव घोरपडे यांची निवड
Image
ताडीवाला रोड येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
Image