भाविकांना दर्शनासाठी मंदिरं खुली करावीत या मागणीसाठी भाजपतर्फे अप्पर इंदिरा नगर येथे घंटानाद आंदोलन

भाविकांना दर्शनासाठी मंदिरं खुली करावीत या मागणीसाठी भाजपतर्फे अप्पर इंदिरा नगर येथे घंटा नाद आंदोलन करण्यात आले.भाजप कार्यकर्त्यांनी मंदिर ‘दार उघड,उद्धवा दार उघड’ची जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी नाही.मात्र भाजपने मंदिरं सुरु करण्याची मागणी लावून धरली आहे.


यावेळी भाजपचे असंख्य कार्यकर्ते मंदिरासमोर जमा झाले. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.‘दार उघड, दार उघड, उद्धवा दार उघड’ अशा घोषणा देत मंदिर उघडण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम व अटी मान्य करून महाराष्ट्रातही देवस्थाने सुरू करण्यात यावेत असे नगरसेविका सौ.मानसीताई देशपांडे यांनी सांगितले.या जनभावनेला राज्य सरकार पर्यंत पोहोचविण्यासाठी नगरसेविका सौ.मानसीताई मनोज देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली घंटा नाद आंदोलन करण्यात आले.



या प्रसंगी जिल्हा कारागृह सल्लागार सदस्य मा.मनोज देशपांडे,स्विकृत सदस्य मा.नितीन बेलदरे मा.प्रशांत दिवेकर, मा.सागरसिंग टाक माजी स्विकृत सदस्य मा.संजय गावडे मा.प्रितम नागापुरे,मा.ज्ञानेश्वर मानकर,मा.अजय भोकरे, मा.अनिल निलुकर,मा.ओमकार माहादे मा.शंतनु बेलदरे,मा.वेद देशपांडे,सौ.जयश्रीताई बिबवे व इतर सहकारी उपस्थित होते.


Popular posts
पुणे महानगर परिवहन महामंडाळातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करा -संचालक पवार
Image
ठेकेदारांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे नागरिकांच्या बाथरूममधून पाणी
Image
दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ.प्रतापसिंह जाधव यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस ऊसतोड कामगार यांचे हस्ते केक कापून साजरा
Image
लहुजी शक्ती सेनेच्या पुणे जिल्हा कोअर किमिटी अध्यक्ष पदी नामदेव घोरपडे यांची निवड
Image
ताडीवाला रोड येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
Image