लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा-लहुजी शक्ती सेना

साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने 'भारतरत्न' पुरस्कार देण्याची मागणी लहुजी शक्ती सेनेने केली आहे.


एका साधारण मातंग कुटुंबात जन्माला आलेल्या अण्णाभाऊंनी त्यांच्या लेखणीतून दलित आणि कष्टकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडली अनेक कादंबऱ्या,कथासंग्रह,नाटक आणि पोवाडे निर्माण केली.जगभरातील२७ भाषामध्ये त्यांच्या साहित्याची भाषांतर करण्यात आली. 



अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून दलितांच्या उत्ननासाठी आयुष्यभर प्रयत्न करणारे थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकारने भारताचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे यासाठी लहुजी शक्ती सेनेने जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. 


आपल्या देशात एका बाजूला संगीत क्षेत्रात पैसे घेऊन गाणारी गायिका लता मंगेशकर आणि क्रिडा क्षेत्रात करोडो रुपये घेऊन खेळणारा सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न पुरस्कार दिला जातो.तर दुसऱ्या बाजूला आपल्या आयुष्याची राखरांगोळी करून एक रुपया न घेता देशातील वंचित जनतेसाठी लढणारा,लिहणारा योध्दा हा भारतरत्न पुरस्कारापासून वंचित राहतो असे निवेदनात म्हटले आहे.


याप्रसंगी लहुजी शक्ती सेनेचे पुणे शहर अध्यक्ष साळवे,पुणे शहर युवक आघाडीचे अध्यक्ष कुमार खंडागळे व पुणे शरह कार्याध्यक्ष दत्ता धडे उपस्थित होते


Popular posts
पुणे महानगर परिवहन महामंडाळातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करा -संचालक पवार
Image
ठेकेदारांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे नागरिकांच्या बाथरूममधून पाणी
Image
दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ.प्रतापसिंह जाधव यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस ऊसतोड कामगार यांचे हस्ते केक कापून साजरा
Image
लहुजी शक्ती सेनेच्या पुणे जिल्हा कोअर किमिटी अध्यक्ष पदी नामदेव घोरपडे यांची निवड
Image
ताडीवाला रोड येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
Image