जागतिक किर्तीचे थोर साहित्यिक,संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार,लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शताब्दी जयंती महोत्सळ समिती २०२० यांच्या वतीने सारसबागेजवळील अण्णा भाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुणे शहराच्या उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.शासकीय नियमांचे पालन करुन अभिवादनाचा कार्यक्रम करण्यात आला.तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी आप-आपल्या घरोघरी अण्णा भाऊच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे,माजी सभागृह नेते सुभाष जगताप नगरसेवक अविनाश बागवे,लहुजी समता परिषदेचे अध्यक्ष अनिल हातागळे,स्विकृत नगरसेवक सुनिल खंडाळे,समितीच्या स्वागताध्यक्षा अँड.राजश्रीताई अडसूळ,कार्याध्यक्ष राहुल खुडे,सचिव निलेश वाघमारे माजी सचिव सचिन जोगदंड व इतर समाज बांधव उपस्थित होते.
लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन