गंगाधाम चौकातील खुन प्रकरणी सख्ख्या भावास अटक

पुण्यातील गंगाधाम चौकातील झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात बिबवेवाडी पोलिसांना यश आले.सदर खुन घरगुती वादातून झाल्याचे पोलिसी तपासात निष्पन्न झाले.या प्रकरणी कविता माखनलाल बेरवा (वय-२८रा.ओंकारनगर,बिबवेवाडी,पुणे यांच्या फिर्यादीनुसार बिबवेवाडी पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.प्रकाश खाजप्पा काणेकर (वय-४०) असे खुन झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.या प्रकरणी त्याचा लहान भाऊ सुरेश खाजप्पा काणेकर वय (-३२) याला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.प्रकाश हा दिवसा बिगारी काम करून रात्री सुरक्षा रक्षकाचे काम करत होता.संतापाने लहान भावाने ४० वर्षीय मोठ्या भावाला लाकडी पलंगाच्या दांडक्याने डोक्यात प्रहार करून निर्घुण खुन केला ही घटना बिबवेवाडी परिसरातील वर्धमान सांस्कृतिक केंद्रा समोरील कालिदास जागडे यांच्या मोकळ्या जागेतील पञ्याच्या शेडमध्ये शनिवारी घडली होती.



पोलिसांनी तपासाला सुरूवात केली असता पत्ते खेळण्याच्या वादातून प्रकाशचा खुन झाल्याची शक्यता वर्तवली होती.परंतु अधिक तपास केला असता प्रकाशच्या सख्ख्या भावाचे नाव पुढे आले.त्यानंतर पोलिसांनी सुरेश खाजप्पा काणेकर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपल्या मोठ्या भावाची प्रकाशचा खुन केल्याची कबुली दिली.या प्रकरणाचा तात्काळ उलगडा करून आरोपीला अटक केल्याबद्दल बिबवेवाडी पोलिस व तपास अधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे


Popular posts
पुणे महानगर परिवहन महामंडाळातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करा -संचालक पवार
Image
ठेकेदारांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे नागरिकांच्या बाथरूममधून पाणी
Image
दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ.प्रतापसिंह जाधव यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस ऊसतोड कामगार यांचे हस्ते केक कापून साजरा
Image
लहुजी शक्ती सेनेच्या पुणे जिल्हा कोअर किमिटी अध्यक्ष पदी नामदेव घोरपडे यांची निवड
Image
ताडीवाला रोड येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
Image