पुरोगामी महाराष्ट्र राज्यात अनुसुचित जाती व जमाती समाजातील व्यक्तीवर सातत्याने विविध प्रकारचे अन्याय अत्याचार घडत आहे.दिवसेंदिवस अन्याय अत्याचारामध्ये वाढ होत आहे.दरम्यान राज्यभर विराज जगताप हत्या प्रकरणी विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून राग व्यक्त होत आहे.
सविस्तर माहिती अशी की,पुण्यामधील पिंपळे सौदागर याठिकाणी काही दिवसांपुर्वी अनुसुचीत जातीमधील कु विराज जगताप या शिक्षित तरुणाची जातीय द्वेषातुन निघृणपणे हत्या केली होती.सदर प्रकरणी आरोपी विरोधात अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा दाखल करूनही घटनेचा तपास योग्य रितीने होत नसल्याने लहुजी शक्ती सेना पुणे शहर कोअर कमिटी या सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना विविध मागणीचे निवेदन दिले.
यावेळी लहुजी शक्ती सेना पुणे शहर कमिटीचे अध्यक्ष नामदेव घोरपडे,विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष विजय गाडे,पुणे शहर चिटणीस महादेव भवाळ,पुणे शहर संघटक रघुनाथ अडागळे,भिमसेना युवा मंच चे पुणे अध्यक्ष राजेश गायगवळी,दलित पँथरचे पुणे सचिव संघटक अजय पुटणे,लमानी बंजारा क्रांतीदल संघटनेचे पुणे अध्यक्ष दिपक मेघावत उपस्थित होते.
कु.विराज जगताप याच्यावर वर आठ ते दहा जणांनी काटे कुटुंबियांनी प्राण घातक हल्ला करुन कु.विराज जगताप याची निघृणपणे हत्या केली.काही प्रतिष्ठित व्यक्तींना घेऊन याचा तपास जाणीवपूर्वक वेगवेगळ्या वळणावर नेण्याचा प्रयत्न केला जात आहे.त्याचप्रमाणे सि.सि.टि.व्ही फुटेज नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.स्थानिक पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करूनही तपासामध्ये जाणीवपूर्वक दिरगांई केली जात आहे.सि.सि.टि.व्ही मध्ये कु.विराज जगतात यास १० ते १२ जण मारत असल्याचे दिसत असतानाही फक्त ६ ते ७ आरोपींना अटक करण्यात आली.सदर गुन्ह्यातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी.सि.सि.टि.व्ही फुटेज नष्ट करणाऱ्यांना या गुन्ह्यात सामिल करावे.तपास अधिक कडक करून फास्ट ट्रँक कोर्टाच्या माध्यमातून पुर्ण करावा.त्याच बरोबर कु.विराज जगताप याच्या कुटुंबास पोलिस संरक्षण देण्यात यावे.इत्यादी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले.