पुणे शहरातील बेकायदेशीर बांधकामे ही मोठी समस्या आहे.दरवर्षी अनेक बेकायदेशीर बांधकामे काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने केली जात आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते नामदेव घोरपडे यांनी गुरुवार पेठेतील सुरू असलेल्या बांधकामाबाबत नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
नामदेव घोरपडे यांनी अधिक माहिती देत असे सांगितले की,गुरुवार पेठेतील बांधकामाबाबत तक्रार अर्ज करूनही बांधकाम विभागातील संबंधित अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे.सदर बांधकामास पुणे मनपाने नियमानुसार मान्यता दिली पण सदर बांधकाम नियमानुसार होत नसल्याने संबंधित अधिकारी दिपक मांजरेकर उपअभियंता बांधकाम विकास विभाग झोन क्र ७ पुणे महानगरपालिका यांनी जागामालक व आर्किटेक प्रशांत पाटील यांना नोटिसाद्वारे आठ दिवसांत खुलासा दाखल करण्यात यावा असे कळवळूनही खुलासा न दिल्याने कारवाई करणे अभिप्रेत होते.परंतु संबंधित अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे.
उपअभियंता दिपक मांजरेकर,इमारत निरीक्षक किसन चव्हाण,जागा मालक व आर्किटेक प्रशांत पाटील यांच्यात कारवाई न करण्याबाबत आर्थिक संगनमत झाले असल्याचे नाकारता येत नाही असे नामदेव घोरपडे यांनी सांगितले.
सदर बांधकाम हे मान्य नकाशाप्रमाणे होत नसल्याने व अटी,नियमांचे उल्लंघन होत असल्याने महाराष्ट्र नगररचना अधिनियमामधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात यावी व आर्किटेक प्रशांत पाटील यांचा परवाना रद्द करावा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते नामदेव घोरपडे यांनी केली.तसेच आंदोलनचा करण्याचा इशारा दिला.