प्रसिद्ध चित्रपट अभिनेता सुशांत सिंह यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
सविस्तर माहिती अशी की,काल रात्री सुशांत सिंहचे काही मित्र त्याच्या घरी होते.आज सकाळच्या सुमारास सुशांतने घराचा दरवाजा उघडला नाही म्हणून त्याच्या घरी काम करणाऱ्या नोकराने दरवाजा तोडला.त्यावेळी सुशांतचा देह घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला.माहिती नुसार सुशांत गत महिन्यापासून डिप्रेशनमध्ये होता.
सुशांतने आपल्या करिअरची सुरवात एक टिव्ही अभिनेता म्हणून केली होती.सुशांतने 'किस देश में हे मेरा दिल' या मालिकेत प्रथम काम केले होते.
माञ त्याला खरी ओळख एकता कपूरच्या ' पवित्र रिश्ता ' या लोकप्रिय मालिकेतुन मिळाली.त्यानंतर त्याने ' काय पो छे 'या चिञपटातुन बाँलीवूड क्षेत्रात प्रदार्पण केले.
या पहिल्या चिञपटातील त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते.त्याच प्रमाणे भारतीय क्रिकेट संघाचा माझी कर्णधार महेद्रसिंग धोनी यांच्या जिवनावर आधारित ' एम एस धोनीःद अनटोल्ड स्टोरी हा चित्रपट गाजला होता.