प्रभाग क्रमांक ३७ मधील नागरिकांना मोफत औषध वाटप

कोरोना सारख्याआजारापासून संरक्षण व्हावे व रोग प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून प्रभाग क्रमांक ३७ मधील मधील नागरिकांना नगरसेविका वर्षाताई भीमराव साठे यांच्या वतीने औषधे वाटप करण्यात आले.


भारत सरकारच्या आयुष मंञालयाने सुचविलेले आर्सेनिक अल्बम गोळ्या,मास्क,सँनिटायझर इ औषधी किट बिलाल मज्जित,साईनगर शिवरायनगर येथे बिबवेवाडी पोलिस स्टेशनचे पी एस आय किरण लिटे यांच्या शुभहस्ते नागरिकांना देण्यात आले.तसेच ५८० कुटुंबाना व बिबवेवाडी पोलीस स्टेशन मधील सर्व स्टाफला आर्सेनिक अल्बम 30 च्या गोळ्या,मास्क सॅनिटायझर इत्यादींचे किट मोफत वाटप करण्यात आले.याप्रसंगी बिबेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी आय घाडगे,पी आय खोकले,वाघमारे, तनपुरे,चिप्पा साहेब आदी उपस्थित होते.लाँकडाउनच्या काळात कार्यरत असणाऱ्या पोलिसांनाही किट देण्यात आले.


या प्रसंगी भिमराव बबन साठे व भागातील सामाजिक कार्यकर्ते भाई शेख,हनुमंत देवकुळे,आप्पा वाल्हेकर,उपस्थित होते.


बाबासाहेब हंकारे,मिननाथ परांडकर,दिपक धडे,दत्ता गायकवाड,पांचाळ,निखिल भालेकर,ओंकार इत्यादी कार्यकर्त्यांनी खूप सहकार्य केले..


Popular posts
पुणे महानगर परिवहन महामंडाळातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करा -संचालक पवार
Image
ठेकेदारांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे नागरिकांच्या बाथरूममधून पाणी
Image
दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ.प्रतापसिंह जाधव यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस ऊसतोड कामगार यांचे हस्ते केक कापून साजरा
Image
लहुजी शक्ती सेनेच्या पुणे जिल्हा कोअर किमिटी अध्यक्ष पदी नामदेव घोरपडे यांची निवड
Image
ताडीवाला रोड येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
Image