खासगी रुग्णालयाकडून कोरोनाग्रस्त रूग्णांची लुटमार

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे.या व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता.सरकारने टाळेबंदीचा निर्णय घेतला होता.परंतु टाळेबंदी करूनही कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने सरकारने टाळेबंदीमध्ये काही अंशी शिथिलता दिल्याने काही प्रमाणात उद्योग व इतर सेवा सुरू आहे.


पुण्यासारख्या जिल्हामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहे.याचा फायदा घेत काही खासगी रुग्णालय मनमानी कारभार करत असल्याचे ग्राहक हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष मिलिंद राजहंस यांनी सांगितले.


मिलिंद राजहंस म्हणाले की,खासगी रुग्णालय शासनाच्या आदेशाची पायमल्ली करून नागरिकांना शासन आदेश आमच्यासाठी नसून सरकारी रुग्णालयासाठी आहे शासनाच्या कोणत्याही योजना आम्हाला लागू होत नाही आम्ही जे बिल देऊ ते तुम्हाला भरावे लागणार म्हणून नागरिकांची दिशाभूल करत आहेत.


कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने खासगी रुग्णालयानांही कोरोनाबाधित रुग्णांवर मोफत उपचार करावेत असे सांगूनही हडपसर मधील नोबोल हाँस्पिटल रुग्णाकडून वेगवेगळ्या पद्धतीने पाच ते आठ लाख रुपयापर्यंत बिले दिली जातात.राज्य शासनाने कोरोनाग्रस्त रुग्णांवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतर्गत मोफत उपचार करावे असे सांगितले.


नोबेल हाँस्पिटलचे अंतिम बिल रेट महाग आहे.कोविड-१९ वार्ड साठी ICUविदाउट व्हेंटिलेटर,Isolation 35000रुपये,कोविड-१९वार्डसाठी ICU विथ व्हेंटिलेटर+Isolation 45000 प्रत्येक दिवसाला इतकी रक्कम आकारले जातात.तसेच मेडिकलची औषधे 150000 ते 200000 पर्यंतची वापरली जातात तश्या चिठ्या दिल्या जातात.वेगवेगळ्या डॉक्टर Consultation fees 12दिवसाची 50,000 ते 75000 रुपये लावली जाते असे मिलिंद राजहंस म्हणाले.याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम पुणे यांच्या कार्यालयामार्फत मुख्यमंत्री ठाकरे व आरोग्य मंञी राजेश टोपे यांना मेल द्वारे तक्रार दाखल केली आहे.परंतु प्रशासनाने अद्याप पर्यंत नोबेल हाँस्पिटल वर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी असे त्यांनी सांगितले.


Popular posts
पुणे महानगर परिवहन महामंडाळातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करा -संचालक पवार
Image
ठेकेदारांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे नागरिकांच्या बाथरूममधून पाणी
Image
दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ.प्रतापसिंह जाधव यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस ऊसतोड कामगार यांचे हस्ते केक कापून साजरा
Image
लहुजी शक्ती सेनेच्या पुणे जिल्हा कोअर किमिटी अध्यक्ष पदी नामदेव घोरपडे यांची निवड
Image
ताडीवाला रोड येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
Image