आमदार तथा भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला. चंद्रकांतदादा यांचा वाढदिवस 'आरोग्यम दिन 'म्हणून साजरा केला जावा या बाबत सुचना झाल्या होत्या.त्यानुसार प्रभाग क्र.३०(ड) दत्तवाडी - जनता वसाहतीचे नगरसेवक शंकरभाऊ गणपत पवार यांनी भाजपा नेते तथा आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागातील १० हजार घरांमध्ये (अर्सेनिक अल्बम ३०) हे होमियोपैथीक औषध वाटप केले.
यावेळी शंकरभाऊ पवार यांनी नागरिकांना घरात राहा सुरक्षित राहा तसेच कोणत्याही अत्यावश्यक कारणास्तव बाहेर पडू नका असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन स्व.सावित्रीबाई गणपत पवार फाउंडेशन याच्या वतीने नगरसेवक शंकरभाऊ गणपत पवार आणि सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कुंडलिक पवार यांनी केले यावेळी कोंढवे-धाडवेचे उप सरपंच सुमित लिंबोरे सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम पार यशस्वी करण्यासाठी संदीप चव्हाण,विकी पवार,शरद रणदिवे,नवनाथ पवार,सुरेश तरडे,अरुण शेलार , राहुल चौतमहाल,संतोष महाडिक यांनी मोलाचे सहकार्य केले.