पोलिसांनी ९७ टक्के रस्त्यावरील बंदोबस्त हटवला

कोरोनाचा महाराष्ट्र राज्यात शिरकाव झाल्यानंतर सुरवातीच्या काळात पुणे शहरात सर्वाधिक रुग्ण आढळले होते.नंतरच्या काळात पुण्यातील कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यात काही प्रमाणात प्रशासनास यश आलं.परंतु काही गेल्या दिवसापासून परत एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला माञ लाँकडाउनच्या चौथ्या टप्पा सुरू झाल्यानंतरही वाढती रुग्ण संख्या अटोक्यात आणण्यात अद्याप यश आल नाही.त्यामुळे कंटेन्मेंट झोनमधील निर्बंध कडक ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरातील खुल्या केलेल्या ९७ टक्के रस्त्यावरचा बंदोबस्त हटवला आहे.


पोलिस आता रस्त्यावरच्या वाहतूकीवर नियंत्रण ठेवणार नाही.त्यामुळे सुरूवातीला पोलिसांच्या भीतीने बाहेर पडायला बिचकणारे नागरिक आता काळजीपूर्वक बाहेर पडत आहे.दरम्यान व्यवहार सुरळीत करण्यासाठी सरकारने प्रतिबंधत क्षेत्र वगळता इतर भागात दुकानांना परवानगी दिली आहे.माञ भीतीपोटी काही नागरिक बाहेर पडत नाही.ज्या दुकानांना सरकारने परवानगी दिली आहे.त्यांनी सकाळी ९ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने चालू ठेवावी व रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे स्पष्टपणे प्रशासनाने सांगितले आहे.


केंद्र व राज्य सरकारच्या नियमावलीनंतर पुणे महानगरपालिकेने लाँकडाउच्या चौथ्या टप्प्यात काय-काय सुविधा,कोणती दुकाने सुरू करणार काय-काय बंद असणार याची माहिती तयार केली आहे.नव्या नियमावलीनुसार  आता रेड झोन व बिगर रेड झोन अशी विभागणी केली आहे.आणि कंटेन्मेंट झोनची सुक्ष्म प्रतिबंधीत क्षेत्र अर्थात मायक्रो कंटेन्मेंट झोन आणि कंटेन्मेंट झोन अशी विभागणी केली आहे.सुक्ष्म प्रतिबंधीत क्षेत्र अर्थात अति संक्रमणशीत भागात अत्यावश्यक सुविधा वगळता इतर सेवा,सुविधा बंदच राहणार आहे.


Popular posts
पुणे महानगर परिवहन महामंडाळातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करा -संचालक पवार
Image
ठेकेदारांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे नागरिकांच्या बाथरूममधून पाणी
Image
दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ.प्रतापसिंह जाधव यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस ऊसतोड कामगार यांचे हस्ते केक कापून साजरा
Image
लहुजी शक्ती सेनेच्या पुणे जिल्हा कोअर किमिटी अध्यक्ष पदी नामदेव घोरपडे यांची निवड
Image
ताडीवाला रोड येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
Image