कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३० मध्ये सँनिटायझर स्टँडचे उद्घाटन

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून त्यापासुन सर्व नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून शंकरभाऊ गणपत पवार आणि तुकाराम कुंडलिक पवार यांनी सिंहगड रोडवरील प्रभाग क्र ३० मध्ये सँनिटायझर स्टँड बसविले.


श्वेता,निलांबरी,राधिका,सरिता वैभव,मंगलमूर्ति तसेच प्रभागातील ५० सोसायटीमध्ये या मशीन बसवन्यात आल्या या कार्यक्रमांचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले.यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी संवाद साधताना कोरोनाशी लढा देणाऱ्या कोरोना योद्धाचे कौतुक करुन सर्व नागरिकांचे सर्व महापालिका प्रशासन,पोलिस प्रशासन,डाँक्टर,नर्स,लोकप्रतिनिधी या सर्वांचे आभार मानले.उद्घाटन प्रसंगी भरतशेठ तेलिसरा,गणेश कवठेकर ,सुजीत सामदेकर आणि सर्व सोसायटीचे चेयरमन पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.


यावेळी नगरसेवक शंकरभाऊ पवार यांनी सोसायटी मध्ये कामासाठी येणाऱ्या प्रत्येक महिला व कर्मचाऱ्यांना मास्क व तापमान चेक करायची मशीन दिली व आत्तापर्यंत जसा आपण लढा देत आलो आहे तसाच यापुढेही देऊ असे आश्वासन शंकरभाऊ पवार यांनी महापौर यांना दिले.


Popular posts
पुणे महानगर परिवहन महामंडाळातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करा -संचालक पवार
Image
ठेकेदारांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे नागरिकांच्या बाथरूममधून पाणी
Image
दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ.प्रतापसिंह जाधव यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस ऊसतोड कामगार यांचे हस्ते केक कापून साजरा
Image
लहुजी शक्ती सेनेच्या पुणे जिल्हा कोअर किमिटी अध्यक्ष पदी नामदेव घोरपडे यांची निवड
Image
ताडीवाला रोड येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
Image