राज्यात रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने गरजूंना वेळेत व पुरेसे रक्त उपलब्ध व्हावे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी कोरोना या जागतिक महामारीच्या अनुषंगाने रक्ताचा तुटवता होऊ नये म्हणून इच्छुकांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होत.यामुळे प्रभाग क्रमांक ३७ चे नगरसेवक व उपशहर प्रमुख शिवसेना बाळासाहेब ओसवाल यांनी तसेच प्रभाग क्रमांक २६चे नगरसेवक श्रीकांतजी पुजारी,पुणे शहर माथाडीचे अध्यक्ष सचिनभाऊ जोगदंड,शिवसेना विभाग प्रमुख अमोलजी रासकर,शिवसेना प्रमुख पदाधिकारी निलेश काका कुलकर्णी,महेशभाऊ कदम,शंकरभाऊ ढवळे,चांदभाई शेख,राजाभाऊ भालके व प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
याला प्रतिसाद देत प्रभागातील नागरिकांनी,पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यांनी रक्तदान केले.यासाठी सह्याद्री हॉस्पिटल ब्लड बँकचे डॉ.पौर्णिमा राव डॉ.अनेघा पलसकर व सर्व टीमचे सहकार्य लाभले.