लाँकडाऊनमुळे अनेक दिवसांपासून राज्यात आणि जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना आपल्या गावी जाण्यासाठी सशर्त परवानगी सरकारने दिलेली आहे.यामुळे टाळेबंदी लागू झाल्यापासूनच गावची ओढ लागलेल्या नागरिकांना गावी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.परंतु काही नागरिकांची माहिती अभावामुळे गैरसोय होत असल्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका वर्षाताई भीमराव साठे यांनी आपल्या अप्पर कोंढवा रोड येथील जनसंपर्क कार्यालया मध्ये महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात व एका जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात जाणाऱ्या नागरिकांचे आँनलाइन फार्म भरण्यात आले.यामध्ये 1100 नागरिकांचे फार्म शासनाच्या नियमानुसार भरुन त्यांना टोकन नंबरसहित पासेस उपलब्ध झाले आहेत.
नगरसेविका वर्षाताई साठे यांच्या जनसंपर्क कार्यालया मध्ये नागरिकांचे आँनलाइन फार्म भरण्याचे काम चालू