महाविकास आघाडी सरकारविरोधात घराच्या अंगणात उभं राहून काळ्या फिती,रिबन लावून,काळे झेंडे उंचावून अथवा काळे फलक हातात घेऊन सरकारचा निषेध नोंदवा असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होत.त्यानुसार भारतीय जनता पार्टी झोपडपट्टी आघाडीचे पुणे शहर सरचिटणीस सागरसिंग टाक यांनी 'माझं अंगण रणांगण','महाराष्ट्र बचाव'अंतर्गत निषेध आंदोलन केले.
याप्रसंगी त्यांनी इतर राज्याप्रमाणे बारा बुलतेदार, रोंजदारी कामगार,रिक्षाचालक,केस कापणारे कारागीर, वुत्तपत्र टाकणारे,छोटे दुकानदार या सर्वांना सरकारने आर्थिक मदत जाहीर करावी.तसेच कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास महाराष्ट्र राज्य सरकार अपयशी ठरल्याने केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक पँकेजचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांना पोहचवण्यात यावा.परप्रांतीय मजुरांना आधारकार्ड द्वारे रेशनिंगचे वाटप करण्यात यावे.यासाठी हे आंदोलन केले असल्याचे सांगितले.