दत्तवाडी परिसरातील श्री ग्रामदैवत म्हसोबाराया उत्सव विधिगत पुजा करून साधेपणाने साजरा करण्यात आला.या उत्सवामध्ये दरवर्षी हजारोच्या संख्येने भाविक येत असतात.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने सर्वच धार्मिक याञा,उत्सव कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे ग्रामदैवत म्हसोबा उत्सव रद्द करण्याचा निर्णय अखिल दत्तवाडी उत्सव कमिटी ग्रामदैवत म्हसोबा प्रतिष्ठान,ट्रस्टने घेतला होता.साधरपणे ५ते ७ दिवसाचा असणाऱ्या या उत्सवामध्ये बालजञा,तमाशा,कुस्ती स्पर्धा,किर्तन इत्यादी कार्यक्रम असतात.कोरोना विषाणूमुळे जगभरात घबराट निर्माण झाली आहे.कोरोनाचा परिणाम याञा,उत्सवांवर ही होऊ लागला आहे.सर्वच धार्मिक स्थळे मस्जिद,मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.ग्रामदैवत म्हसोबा उत्सवास अनेक वर्षापासून ची परंपरा आहे.शेजारील परिसरातील अनेक भाविक या उत्सवामध्ये सहभागी होत असतात.तसेच श्री ग्रामदैवत म्हसोबा उत्सवाच्या निमित्ताने अखिल दत्तवाडी उत्सव कमिटी ट्रस्ट व धर्मगर्जना प्रतिष्ठान पुणे शहर तसेच ज्ञानयोग सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.