कदम-वाकवस्ती : बेकायदेशीर गावठी पिस्तुल बाळगण्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी मौजे:कदम-वाकवस्ती (पठारेवस्ती) परिसरातून तिघांना अटक केली. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तुल,आठ जिवंत काडतुसे व एक रिकामी मॅगझीन जप्त करण्यात आलेली असून या प्रकरणी फिरोज महंमद शेख (वय,२५ रा.घोरपडेवस्ती कदमवाकवस्ती,आनंद महादेव चव्हाण (वय,२३ रा.पठारे कदमवाकवस्ती आणि निलेश नागेश जेटीथोर (वय २२ रा.कदमवस्ती,कदमवाकवस्ती)या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सविस्तर माहिती अशी की,मौजे:कदम-वाकवस्ती परिसरात फिरोज महंमद शेख हा त्याच्या दोन मित्रांसह कंबरेला पिस्तुल लावून फिरत असल्याची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उप-निरीक्षक शिवाजी ननवरे यांना बातमीदारामार्फत मिळाली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांना याविषयी माहिती देऊन ननवरे पोलीस पथकासमवेत कदम-वाकवस्ती परिसरातील हॉटेल प्यासाजवळ गेले असता.त्याठिकाणी तिघेजण संशयीतरित्या थांबलेले आढळून आले.यावेळी पोलिसांची चाहूल लागताच पळून जाऊ लागताच पोलिसांनी त्यांना पकडून झडती घेतली असता त्यातील फिरोज महंमद शेख याच्या पॅन्टचे डावे कंबरेस आतील बाजुस खोवलेला एक गावठी पिस्तुल व मॅगझीनमध्ये ५ जिवंत काडतुसे मिळून आली तर सोबत असलेल्या आनंद महादेव चव्हाण याकडे ३ जिवंत काडतुसे मिळून आली.हे गावठी पिस्तुल व काडतुसे यांनी निलेश नागेश जेटीथोर याने दिले असल्याची माहिती फिरोज शेख व आनंद चव्हाण यांनी पोलिसांना दिली.यांच्याकडून गावठी पिस्तुल, आठ जिवंत काडतुसे व एक मोकळे मॅगझीन असे एकुण २८,६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पाटील अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक शिवाजी ननवरे,पो.ना.परशराम सांगळे व लोकेश राऊत यांनी केली.