अप्पर डेपो शेजारील महेश सांस्कृतिक भवन येथे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नगरसेविका वर्षाताई भिमराव साठे यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली.
याप्रसंगी महापौर मुरलीअण्णा मोहोळ,स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आमदार सुनिल कांबळे,नगरसेवक श्रीनाथ भिमाले नगरसेवक मा.आबा शिळीमकर आणि पर्वती मतदार संघाचे अध्यक्ष जितेंद्रजी पोळेकर उपस्थित होते.नगरसेविका वर्षाताई भीमराव साठे यांनी गेल्या दोन-तीन महिन्यात केलेल्या कामाचा आढावा सादर करून या भागातल्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या आणि येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये जनतेसाठी कोरोना या रोगापासून बचाव करण्यासाठी काय काय उपाय योजना करता येतील याच्यावर चर्चा करण्यात आली.त्यावेळी महापौर मुरलीअण्णा मोहोळ यांनी महानगरपालिकेकडून पूर्णपणे सहकार्य केले जाईल आश्वासन दिले.याप्रसंगी भिमराव साठे यांनी आलेल्या सर्व माननीय यांचे आभार व्यक्त केले.