भाजपाच्या 'माझं अंगण रणांगण' आंदोलनाल शिवसेनेकडून प्रत्युत्तर

कोरोनाचं संकट राज्यात वाढत चालले आहे.देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत.कोरोनाचं संकट रोखण्यात राज्यातील ठाकरे सरकारला अपयश आल्याचं सांगत भाजपने राज्य सरकारविरोधात आंदोलन केले.ठाकरे सरकारविरोधात घराच्या अंगणात उभं राहून काळ्या फिती,रिबन लावून,काळे झेंडे उंचावून अथवा काळे फलक हातात घेऊन ठाकरे सरकारचा निषेध नोंदवा,असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.


'माझं अंगण रणांगण','महाराष्ट्र बचाव'अंतर्गत हे निषेध आंदोलन करण्यात आलं.तर भाजपच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेने महाराष्ट्रद्रोही भाजप असं आंदोलन सुरु केल.कोरोनाविरुद्धच्या लढ्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे.त्यामुळे या सरकारला जागे करून प्रभावी काम करण्यास भाग पाडण्यासाठी भाजपाने महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरू केले.कोरोनाला रोखण्यात ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचं दिसून येत आहे.संकट मोठं आहे म्हणून सहकार्य करा,असं सरकारकडून वारंवार सांगितलं जात होत.


दरम्यान आज भाजपने महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरू केले. सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत घराच्याबाहेर उभं राहून काळ्या फिती, काळे झेंडे, रिबन आणि फलक उंचावून सरकारचा निषेध नोंदवला गेला.महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाला मोठ्या धीराने सामोरे जात असताना भाजप गलिच्छ राजकारण करत असल्याचं शिवसेनेने नेत्यांनी म्हटलं आहे.


नगरसेवक बाळासाहेब ओसवाल यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्र ३७ बिबवेवाडी या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है,झिंदाबाद झिंदाबाद शिवसेना झिंदाबाद अश्या घोषणा देत शिवसेनेने भाजपच्या आंदोलाना प्रत्युत्तर दिले या प्रसंगी सचिन जोगदंड,शंकर ढवळे,निलेश काका कुलकर्णी,महेश कदम,चांदभाई शेख,राजाभाऊ भालके


व अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.


Popular posts
पुणे महानगर परिवहन महामंडाळातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करा -संचालक पवार
Image
ठेकेदारांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे नागरिकांच्या बाथरूममधून पाणी
Image
दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ.प्रतापसिंह जाधव यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस ऊसतोड कामगार यांचे हस्ते केक कापून साजरा
Image
लहुजी शक्ती सेनेच्या पुणे जिल्हा कोअर किमिटी अध्यक्ष पदी नामदेव घोरपडे यांची निवड
Image
ताडीवाला रोड येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
Image