कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात ३१ मे पर्यंत लाँकडाऊन घोषित करण्यात आला आहे.कोरोनाचे संकट लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाकडून उपाययोजना राबविण्यात येत आहे.पुण्यात काही दिवसापुर्वी रस्त्यावरील पोलिस बंदोबस्त हटविण्यात आला होता.त्यामुळे नागरिक रस्त्यावर येत आहे.
पुण्यातील काही भागामध्ये लाँकडाऊनमध्ये शिथिलता देत काही दुकानांसह भाजीपाला विक्री करण्यास परवानगी देण्यात आली.भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन हद्दीमधील काञज परिसर,कोंढवा रोड,लेक टाऊन सोसायटी,ञिमूर्ती चौक,भारती विद्यापीठ मागील मार्केट परिसर भागामध्ये भरणाऱ्या भाजीबाजारामुळे आणि रस्त्याकडेला लागणाऱ्या फळविक्रेत्यांच्या हातगाड्यांमुळे गर्दी उसळली होती.यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा वाजले होते.सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाने अनेकदा नागरिकांना गर्दी न करण्याच्या सूचनाही दिल्या.पण फळ विक्रेते व भाजीपाला विक्रेत्यांनी प्रशासनाचे आदेश धुडकवून टाकले.होणाऱ्या गर्दीमुळे विषाणू संसर्गाचा धोका होण्याची शक्यता असल्याने अखेर आज दिनांक २७ मे रोजी पुणे महानगरपालिका यांनी पोलिस बंदोबस्तात हातगाड्यांचे अतिक्रमण काढण्यात आले.तसेच हातगाड्य जप्त करत कारवाई केली.बेकायदेशीर सोशल डिस्टन्सिंग न पाळता कोरोना संसर्ग होईल अशाप्रकारे भाजीविक्री करणारे व पथारी व्यावसायिक यांच्या विरुध्द कारवाई करण्यात आली. ही कारवाई भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुवर साहेब,पोलिस निरीक्षक (गुन्हे) विष्णू ताम्हाणे,भारती विद्यापीठ वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांच्यासहित पोलिस कर्मचारी,अतिक्रमण विभागाचे अधिकारी सोनार व तारु यांनी केली.