अप्पर सुप्पर परिसरात कोरोना प्रतिबंधात्मक औषध फवारणी

पुणे-अप्पर सुप्पर भागातील कंटेनमेंट झोन असलेला भाग गणेशनगर या ठिकाणी कोरोना  (covid-19) चे  21 पेशंट मिळाले आहेत.त्यामुळे सुपर पाण्याची टाकी व सिद्धार्थनगर  या संपूर्ण भागांमध्ये बिबेवाडी वार्ड ऑफिस चे कर्मचाऱ्या मार्फत कोरोना प्रतिबंधात्मक सोडियम हायड्रोक्लोराईड औषध फवारणी नगरसेविका वर्षाताई भिमराव साठे यांच्या प्रयत्नातून करण्यात आली.त्याप्रसंगी आरोग्य किटक विभागाचे वरिष्ठ MSI श्री. रोहन चव्हाण साहेब, डी.एस.आय लाड साहेब,आरोग्य विभागाचे  SI महेश जाधव साहेब.यांचे सहकार्य मिळाले.तसेच कार्यकर्ते,हापिक शेख,गौरव जगताप,सागर मिसाळ,रोहित रोडके ,संजय कुंभार कर,कृष्णा दोडमनी,हुसेन शेख,अमर लगस आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.परंतु नागरिकांनी घाबरून न जाता आलेल्या संकटावरती खंबीर पणाने मात करून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.आणि कारण नसतानी घराबाहेर न जाण्याचे आणि आपण स्वतःला घरामध्येच सुरक्षित ठेवावे असे आवाहन भिमराव साठे यांच्या कडुन करण्यात आले.


Popular posts
पुणे महानगर परिवहन महामंडाळातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करा -संचालक पवार
Image
ठेकेदारांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे नागरिकांच्या बाथरूममधून पाणी
Image
दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ.प्रतापसिंह जाधव यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस ऊसतोड कामगार यांचे हस्ते केक कापून साजरा
Image
लहुजी शक्ती सेनेच्या पुणे जिल्हा कोअर किमिटी अध्यक्ष पदी नामदेव घोरपडे यांची निवड
Image
ताडीवाला रोड येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
Image