कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरात विवाह सोहळा संपन्न

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक विवाह सोहळे रद्द झाले आहेत.देशात टाळेबंदी नियम लागू असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे.त्यामुळे ज्यांची लग्ने ठरलेले होती.त्यांच्या समोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यातच टाळेबंदी कधी उठेल,मंगल कार्यालय मिळेल का नाही हे देखील प्रश्न आहेत.त्यावर दत्तवाडीतील एका कुटुंबाने घरातच विवाह सोहळा केला.कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने त्याचा फटका विवाह सोहळ्यावर पडत असल्याचे निदर्शनास येत आहे.


देशात टाळेबंदी नियम लागू असल्यामुळे विवाह सोहळा करणे कठीण वाटत असल्यामुळे दत्तवाडीमधील सं.नं ९९९ अनंतकृपा सोसायटीमध्ये राहणारे उभे यांचा सुपुञ व मोकाटे यांची कन्या यांचा विवाह सोहळा सुरक्षित अंतर व नियमांचे पालन करुन संपन्न केला.सदर लग्न समारंभास दोन्हीकडील ५-५नातेवाईक उपस्थित होते.


या प्रसंगी विशेष पोलिस अधिकारी गणेश केरबा ठाकर यांनी वधु-वरास मास्क व सँनिटायझर देऊन शुभेच्छा दिल्या.


Popular posts
पुणे महानगर परिवहन महामंडाळातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करा -संचालक पवार
Image
ठेकेदारांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे नागरिकांच्या बाथरूममधून पाणी
Image
दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ.प्रतापसिंह जाधव यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस ऊसतोड कामगार यांचे हस्ते केक कापून साजरा
Image
लहुजी शक्ती सेनेच्या पुणे जिल्हा कोअर किमिटी अध्यक्ष पदी नामदेव घोरपडे यांची निवड
Image
ताडीवाला रोड येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
Image