कोरोना विषाणूपासून होणाऱ्या कोविड -१९ (COVID- 19) आजाराला रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.त्यांच्या या कार्यास हातभार लागावा म्हणून शिवसेना पर्वती मतदारसंघाच्या वतीने ''मुख्यमंत्री'' सहाय्यता निधी कोविड-१९ साठी रक्कम रुपये १,०५,५०० चा धनादेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देण्यात आला. नगरसेवक बाळासाहेब ओसवाल,विभाग प्रमुख अमोल रासकर,सचिन देडे,सुरज लोखंडे,श्रीकांत पुजारी,शशिकांत पापळ,राजेंद्र शिळमकर,सचिन जोगदंड,कमलेश मानकर किशोर रजपुत,श्रुती नाझीरकर,व सर्व उपविभाग प्रमुख,प्रभाग प्रमुख,शाखा प्रमुख,युवासेना यांच्या सहकार्याने मदतीचा धनादेश देण्यात आला.माजी नगरसेविका दिपालीताई ओसवाल यांनी विशेष सहकार्य केले.
कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत.कोरोनाशी लढण्यासाठी मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ या नव्या खात्याची निर्मिती करण्यात आली आहे.या खात्यात उद्योजक,स्वयंसेवी संस्था,धार्मिक संस्था,नागरिकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते.