सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उभारलेल्या कोरोना मुक्ती जनजागृती अभियाना अंतर्गत बन्सीलाल रामनाथ अगरवाल चारीटेबल ट्रस्ट संचलित विश्वकर्मा कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स व सायन्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी २५०० मास्क तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला होतो.व तो यशस्वीपणे पूर्ण करून १० मे २०२०,रोजी कोंढवा पोलीस चौकी,बिबेवाडी पोलीस चौकी,भारती विद्यापीठ पोलीस चौकी,भाजीवाले,सफाई कामगार,सुरक्षा रक्षक व इतर गरजूंना महाविद्यालयीन प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली मास्क वाटप करण्यात आले.या कार्यक्रमात कॉलेजमधील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले होते.
विश्वकर्मा कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स व सायन्स महाविद्यालयाकडून मास्क वाटप