कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन कठोर उपाय योजना करत आहे.यासाठी नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून नगरसेविका वर्षाताई भीमराव साठे यांच्या प्रयत्नातून सुप्पर दुर्गामाता गार्डन या ठिकाणी नागरिकांची व लहान मुला-मुलींची डाँक्टरांच्या मदतीने आरोग्य तपासणी करण्यात आली.या शिबिरामध्ये सुमारे 528 नागरिकांनी आपल्या तपासण्या करून घेतल्या.तसेच तपासणी करणाऱ्या नागरिकांनी सोशल डिस्टन्सचे पालन करून सहकार्य केले.


तसेच आजारी असणाऱ्यां नागरिकांसाठी गोळ्या औषधांचे वाटप करण्यात आले.आणि शिबिरामध्ये डॉ.तेजस कदम,गुलाबराव पवार, दत्तात्रेय मोहोळ,जयसिंग परदेशी त्याच प्रमाणे उमाताई कांबळे,ओमकार कांबळे,मिनानाथ परांडकर,गोपाल चव्हाण सुरज आंब्रे,तसेच कार्यकर्ते आणि BJS टीम ( bhartiy Jain sanghatana) या सर्वांनी आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.याप्रसंगी भिमराव साठे उपस्थित होते.


Popular posts
पुणे महानगर परिवहन महामंडाळातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करा -संचालक पवार
Image
ठेकेदारांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे नागरिकांच्या बाथरूममधून पाणी
Image
दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ.प्रतापसिंह जाधव यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस ऊसतोड कामगार यांचे हस्ते केक कापून साजरा
Image
लहुजी शक्ती सेनेच्या पुणे जिल्हा कोअर किमिटी अध्यक्ष पदी नामदेव घोरपडे यांची निवड
Image
ताडीवाला रोड येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
Image