ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन

बॉलिवूड विश्वाला सलग दुसऱ्या दिवशी दुसरा धक्का बसला आहे.हरहुन्नरी कलाकार इरफान खान यांनी काल (20 एप्रिल)जगाला अलविदा केल्यानंतर आज (30 एप्रिल) बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.ऋषी कपूर यांच्यावर एक आठवड्यापासून रुग्णालयात उपचार सुरु होते.सलग दोन कलाकार गमावल्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.


"कॅन्सरच्या आजारातील गुंतागुंतीमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात होत.ते मागील एक आठवड्यापासून तिथेच होते.यावेळी उपचारादरम्यान त्यांना अनेक वेळा व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं,"अशी माहिती सूत्रांनी दिली होती. मात्र आज त्यांची प्राणज्योत मावळली.यावेळी ऋषी कपूर यांच्या पत्नी नीतू सिंह या त्यांच्यासोबत रुग्णालयात होत्या.


ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांची कॅन्सरशी झुंजअपयशी


ऋषी कपूर यांना सुमारे दोन वर्षांपूर्वी कॅन्सर झाल्याचं समोर आलं होतं.जवळपास वर्षभर न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेऊन ते भारतात परतले होते.परंतु त्यांची कॅन्सरसोबतची झुंज अपयशी ठरली.


ऋषी कपूर मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेतील न्यूयॉर्कमधून कॅन्सरचा इलाज करुन मुंबईत परतले होते. या उपचारादरम्यान ऋषी कपूर अमेरिकेतील रुग्णालयात 11 महिने आणि 11 दिवस होते.


न्यूयॉर्कमध्ये उपचारादरम्यान ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्यासह दीपिका पादूकोण,शाहरुख खान,आमीर खान,अनुपम खेर यांसारख्या अनेक कलाकारांनी ऋषी कपूर यांची भेट घेतली होती.


न्यूयॉर्कहून परतल्यानंतर ऋषी कपूर यांनी 'द बॉडी' नावाच्या चित्रपटात काम केलं होतं.या सिनेमात त्यांच्यासोबत इम्रान हाश्मी आणि शोभिता धुलिपाला प्रमुख भुमिकेत होते.


 


Popular posts
पुणे महानगर परिवहन महामंडाळातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करा -संचालक पवार
Image
ठेकेदारांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे नागरिकांच्या बाथरूममधून पाणी
Image
दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ.प्रतापसिंह जाधव यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस ऊसतोड कामगार यांचे हस्ते केक कापून साजरा
Image
लहुजी शक्ती सेनेच्या पुणे जिल्हा कोअर किमिटी अध्यक्ष पदी नामदेव घोरपडे यांची निवड
Image
ताडीवाला रोड येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
Image