बाँलिवूड अभिनेते इरफान खान यांचं निधन झालं.वयाच्या 54 व्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.इरफान खान यांना न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर नावाचा आजार होता.परंतु काल अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते.परंतु आज ते मृत्यूझी झुंज हरले.
चित्रपट निर्माते शूजित सरकार यांनी इरफान खान यांच्या निधनाची बातमी दिली.त्यांनी ट्विट करुन इरफान खान यांचं निधन झाल्याचं सांगितलं.त्यांनी लिहिलं आहे की,"माझा प्रिय मित्र इरफान..तू लढलास.मला तुझा अभिमान आहे. आपण पुन्हा भेटू. स्तुपा आणि बाबिल यांचं सांत्वन..तुम्ही सुद्धा लढलात या लढाईत तू शक्य तेवढं केलंस.तुझ्या आत्म्याला शांती मिळो...इरफान खान सलाम."