करोना रोगाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने लॉकडाऊन घोषित करून देखील अनेक नागरिक विविध कारणांमुळे घरातून बाहेर पडताना दिसत आहे. यामुळे या रोगाचा संसर्ग रोखण्यापेक्षा दिवसेंदिवस वाढत चाललेला दिसत आहे. या पार्श्वभूमीवर दत्तवाडीतील सर्व गणेश मंडळातील कार्यकर्ते ,व्यापारी वर्ग एकत्रितपणे येऊन दत्तवाडीचा संपूर्ण भाग कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे.पुणे महानगरपालिका व दत्तवाडी पोलिस स्टेशन यांच्या वतीने वारंवार आवाहन करूनही काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असल्यामुळे बंदचा निर्णय घेण्यात आला.सध्या पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून पुण्यासह उपनगरांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.करोना रोगाचा वाढत संसर्ग लक्षात घेता,वाढ टाळण्यासाठी दत्तवाडीचा परिसर (मेडिकल व दवाखाना सोडून) बंद ठेवण्यात आला आहे.
दत्तवाडीकरांचा स्वयंस्फूर्तीने बंद