सामाजिक सुरक्षा विषयीच्या {Social Distancing} स्तुत्य उपक्रमाला भाजीपाला व्यापाऱ्यांकडून दिली जातेय जाणीवपूर्वक तिलांजली.आप-कमाईच्या नादात प्रशासनाने ठरवून दिलेल्या सुरक्षा नियमांची विनापरवाना भाजीपाला व्यावसायिकांकडून ऐसीं की तैंसी.कोरोना या महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने आजच्या घडीला सध्यस्थितीत अतिमहत्त्वाचे सुरक्षेचे साधन म्हणजे सॅनिटीझर-हॅन्डग्लोज आहे.परंतु याच्या वापराकडे भाजीपाला व्यापारीवर्ग-ग्राहकांनी अक्षरशः फिरवली पाठ.कदम-वाकवस्ती,लोणी काळभोर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रं.६५ कवडीपाट टोलनाका ते राजबाग कॉर्नर येथे विनापरवाना भाजीपाला व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून सरकारने पुकारलेल्या लॉक-डाऊनचा हेतुपुरस्सर होतोय अवमान.स्थानिक पोलिसांकडून वारंवार केल्या-गेलेल्या विनंत्या-सूचनांचा भाजीपाला व्यापाऱ्यांकडून जाणीवपूर्वक उडवला जातोय फज्जा.संचारबंदीचे हेतुपुरस्सर नियम धाब्यावर बसवून विनापरवाना भाजीपाल्याचा व्यवसाय करणांऱ्यावर कायदेशीर कारवाईची मागणी दिवसेंदिवस वाढते आहे.लोणी काळभोर पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन करणांऱ्यावर कठोरात-कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी स्थानिक नागरिकांमध्ये एकच चर्चा आहे .