3 मे पर्यंत लाँकडाउन कायम -मोदी

नई दिल्लीःकोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉक डाउन संपूर्ण देशात घोषित केला होता.तो २१ दिवसाचा लॉक डाउन आज 14 एप्रिल रोजी समाप्त होत आहे.या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी दहा वाजता जनतेशी संवाद साधत लॉक डाऊन ३ मे पर्यंत वाढवला असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.संपूर्ण देशात तीन मे पर्यंत लॉक डाउन असणार आहे.परंतु या लाँक डाउन काळातील गाईडलाईन उद्या जाहिर करणार असल्याचे पंतप्रधान यांनी सांगितले.


भारत देश उत्सवांच्या मध्ये सदैव खेळत असतो


इतर देशांच्या तुलनेत कोरोनाचा सामना भारताने नियोजनबद्ध केला


जेव्हा भारतात कोरोना नव्हता तेव्हाच इतर देशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरु केली होती


जेव्हा आपल्याकडे ५५० केसेस होत्या तेव्हा भारताने लॉकडाऊन घोषित केले


आर्थिक दृष्टीने मोठी किंमत चुकवली आहे


मर्यादा असलेल्या संसाधनांच्या सोबत घेऊन आपण कोरोनाचा चांगला प्रतिकार केला


लोकांना येणाऱ्या अडचणी कशा दूर केल्या जातील याकडे लक्ष देण्यात येईल.


जिथे कोरोना नियंत्रणात येईल त्याठिकाणी काही प्रमाणात २० एप्रिल नंतर निर्णय घेण्यात येईल


३ मे पर्यंत संपूर्ण देशात पूर्णपणे लॉकडाऊन कायम राहील


रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांसाठी २० एप्रिलपासून काहीप्रमाणात शिथिल करण्यात येईल


पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून नागरिकांना मदत केली जाईल


राज्य सरकारांना सहाय्य करण्यात येईल.


भारतात एक लाख बेडची सुविधा करण्यात आली आहे


देशात ६०० रुग्णालये कोरोना उपचार विशेष रुग्णालये तयार करण्यात आली आहेत


मार्यादिन संसाधने असले तरीही आपण चांगले काम करतो आहोत


कोरोना लस बनविण्यासाठी देशाचे तज्ञांनी विडा उचलावा यासाठी आवाहन


आपल्या घरातील वायास्कारांचा विशेष काळजी घ्या  त्यांना कोरोनापासून वाचवायचे आहे


लॉकडाऊन आणि सामाजिक अंतराचा पालन करा


घरी बनवलेला मास्कचा वापर करा


रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करा


कोरोन संक्रमण चा फैलाव कमी करण्यासाठी आरोग्य सेतू मोबाईल अप्प डाऊनलोड करा


Popular posts
पुणे महानगर परिवहन महामंडाळातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करा -संचालक पवार
Image
ठेकेदारांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे नागरिकांच्या बाथरूममधून पाणी
Image
दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ.प्रतापसिंह जाधव यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस ऊसतोड कामगार यांचे हस्ते केक कापून साजरा
Image
लहुजी शक्ती सेनेच्या पुणे जिल्हा कोअर किमिटी अध्यक्ष पदी नामदेव घोरपडे यांची निवड
Image
ताडीवाला रोड येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
Image